आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

साहित्य-

१)कांद्याची पात -१ जुडी

२)मुगाची डाळ-१/२ वाटी

३)टोमॅटो -१ छोटा बारीक चिरून

४)आलं-लसूण पेस्ट -१ टी स्पून

५)जिरे-मोहोरी-१ टी स्पून

६)हळद-१/२ टी स्पून

७)धनेपूड-१ टी स्पून

८)लाल तिखट-२ टी स्पून

९)चवीनुसार मीठ

१०)गरजेनुसार तेल

कृती-

१)प्रथम मुगाची डाळ धुवून   साधारण १० ते १५ मिनिट भिजत राहू द्यावी .कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी .

२)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून तडतडू द्यावी .आता यांत आलं-लसूण पेस्ट तसेच टोमॅटो घालावा व नीट परतून घ्यावे .

३)यात हळद,धनेपूड,लाल तिखट घालून परतून घ्यावे व यांत भिजवलेली मुगाची डाळ घालावी व परतून घ्यावे .आता यात १ वाटी पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी (मुगाची डाळ साधारण अर्धी शिजलेली असेल तेव्हा)व यांत बारइक चिरलेली कांद्याची पात घालावी व चवीनुसार मीठ घालावे व गरज असल्यास थोडे पाणी घालावे व झाकण ठेवावे .

४)मुगाची डाळ पूर्णपणे शिजलेली असेल तेव्हा आच बंद करावी व गरमागरम भाजी पोळीसोबत सर्व्ह करावी .

Comments on: "कांद्याच्या पातीची भाजी" (2)

  1. changalaa upakaram ahe! keep it up !! alambee baddal mahitee milel ka>

Leave a reply to harshadsamant उत्तर रद्द करा.