आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

पालकाचे घावन

पालकाचे घावन

साहित्य-

१)अर्धी जुडी पालक -उकडून बारीक चिरलेला

२)बेसन-३ ते ४ टेबल स्पून

३)दही-२ टेबल स्पून

४)१ छोटा कांदा बारीक चिरून

५)१ छोटा टोमॅटो-बारीक चिरून

६)आलं-लसूण पेस्ट -१/२ टी स्पून

७)लाल तिखट-१ टी स्पून

८)हळद-चीमुटभर

९)कोथींबीर-बारीक चिरून

१०)चवीनुसार मीठ

११)गरजेनुसार तेल

कृती-

१)एका बाउलमध्ये बेसन घ्यावे व त्यात बारीक चिरलेला पालक,कोथींबीर,कांदा,टोमॅटो व आलं-लसूण पेस्ट घालुन   यांत दही घालून एकजीव करावे तसेच थोडे पाणी घालून भज्यांसाठी भिजतो त्यापेक्षा किंचित घट्टसर पीठ भिजावे .

२)आता यात लाल तिखट,हळद व चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकजीव करावे .

३)एका डोसा तव्यावर थोडे तेल टाकून  पसरवून घ्यावे व त्यावर वरील तयार पीठ एका खोल चमच्याने घालावे व किंचित पसरवून घ्यावे .तव्यावरघातलेले घावन ह्याप्रमाणे दिसतील-

४)आता तव्यावर झाकण ठेवून एक बाजू नीट शेकून घ्यावी व   दुसरी बाजूही त्याचप्रमाणे पुन्हा  झाकण ठेवून शेकून घ्यावी व गरमागरम घावन नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे .

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: