आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

आमच्या नवीन जागी आम्ही आपली वाट पाहत आहोत.

www.mejwani.in

स्थलांतर

स्थलांतर

स्थलांतर

भरवा मिरची

भरवा मिरची 
साहित्य-
1)जाड हिरव्या मिरच्या -5
१)बेसन-४ टेबल स्पून 
२)शेंगदाणा कूट- २ टेबल स्पून
३)आल-लसून पेस्ट-१ टी स्पून
४ )ओवा-१/४ टी स्पून
५)जिरे-१/२ टी स्पून
६)हळद-चिमूटभर
७)चवीनुसार मीठ
८)गरजेनुसार तेल
९)बारीक चिरलेली कोथांबीर
कृती-
१)प्रथम मिरच्या धुवून  ,पुसून घ्याव्यात व त्यांना मधोमध उभा काप द्यावा ,जास्तीच्या बिया काढून टाकाव्यात 
२)आता एका बाउलमध्ये बेसन,शेंगदाणा कूट,जिरे,ओवा,हळद व चवीनुसार मीठ घालून मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे ,आता यातच  एक पळीभर तेल घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावे व यातच बारीक चिरलेली कोथांबीर घालावी .
३)वरील तयार मिश्रण मिरच्यांमध्ये नीट दाबून दाबून भरून घ्यावे .
४)आता एका कढइत तेल गरम करावे व त्यात ह्या मिरच्या मसाला भरलेली बाजू वर राहील अश्या पद्धतीने ठेवावे .मिरच्या ह्याप्रमाणे दिसतील –
५)आता कढइत थोड्याश्या पाण्याचा हबका मारून झाकण ठेवावे साधारण ५ मिनिटातच एक बाजू झालेली असेल तेव्हा बाजू उलटून घ्यावी व पुन्हा किंचितश्या पाण्याचा हबका मारून झाकण ठेवावे व दुसरी बाजू झाल्यावर आच बंद करावी व मिरच्या सर्व्ह कराव्यात .
टीप-
१) मिरच्यांमध्ये भरल्यानंतर मिश्रण  उरले  तर त्याचे मुटकुळे बनवून तेही मिराच्यान्सोबतच कढइत ठेवावे ,छान लागतात .
 
वरण चकोल्या (चिखल्या )
साहित्य-
१)तूर दाल-१ कप
२)गव्हाची कणिक -२ कप
३)ओवा -१/२ टी स्पून
४)चवीनुसार मीठ

वरण चकोल्या (चिखल्या )

फोडणीसाठी-
१)जिरे-मोहोरी-१ टी स्पून
२)लसून-३ ते ४ पाकळ्या बारीक चिरून
३)हिरव्या मिरच्या-३ बारीक चिरून
४) १ लहान टोमाटो -बारीक चिरून
५)हळद-१/८ टी स्पून
६)कढीपत्ता -५ ते ६ पाने
७)गरजेनुसार तेल 
८)सजावटीसाठी कोथांबीर 
कृती-
१)प्रथम एका प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवावे ,पाणी गरम झाले कि त्यात धुतलेली तुरीची डाळ घालावी व झाकण लावून घ्यावे .
२)आता कणकेत ओवा आणि थोडेसे मीठ घालून कणिक मळून घ्यावी ,तयार कणकेचे समान भाग करून घ्यावेत
 .तयार कणकेची थोडी जाडसर पोळी लाटून घ्यावी व शंकरपाळे कापून घेतो तसे कापून घ्यावे ,ते ह्याप्रमाणे दिसेल.

चकोल्या

३)आता कुकरची वाफ काढून घ्यावी व झाकण उघडून त्यात ह्या कापलेल्या चकोल्या घालाव्यात व पुन्हा कुकरचे झाकण बंद करून १ शिट्टी करून घ्यावी व आच बंद करावी व वाफ निघू द्यावी
४)आता एका छोट्या कढइत किंवा वघारीयात तेल गरम करण्यास ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी चांगली तडतडू द्यावी ,यानंतर त्यात कढीपत्ता , बारीक चिरलेला लसून,हिरवी मिरची व टोमाटो घालावा तसेच हळदही घालावी व हि तयार फोडणी वरण-चकोल्यांवर घालावी  व १ ते २ मिनिटात आच बंद करून यावर बारीक चिरलेली कोथांबीर घालावी व वरून साजूक तूप घालून चकोल्या सर्व्ह कराव्यात .
टीप-
१)यात पाण्याचे प्रमाण नेहमीच्या वरणासाठी ठेवतो त्यापेक्षा  जास्तच ठेवावे .
२)चकोल्यात साजूक तूपाएवजी लोणच्याचे तेल घालून खाल्ले तरी छान लागते .
 

 

साबुदाणा वडा

साबुदाणा वडा
साहित्य-
१)भिजवलेला साबुदाणा -सव्वा कप
२)उकडलेले बटाटे -२ मध्यम आकाराचे
३)शेंगदाण्याचा कूट-२ ते ३ टेबल स्पून

साबुदाणा वडा

४)लाल तिखट-दीड टी स्पून
५)लिंबाचा रस -दीड टी स्पून
६)कोथांबीर-बारीक चिरलेली
७)चवीनुसार मीठ
८)तळण्यासाठी तेल
चटणीसाठी
खवलेले ओले खोबरे -१/२ कप
२)हिरव्या मिरच्या -२ (लहान )
३)दही-३ टेबल स्पून
४)कोथांबीर-१/२ कप
कृती-
१)साबुदाणा खिचडीच्या रेसेपित दिल्याप्रमाणे साबुदाणा भिजवून घ्यावा .साबुदाणा खिचडीच्या रेसेपिसाठी इथे –क्लिक करा .
२आता उकडलेला बटाटा किसून घ्या व यात भिजवलेला साबुदाणा घालून नीटएकजीव करून घ्यावे वयातशेंगदाण्याचा कूट ,लाल तिखट,लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथांबीर व चवीनुसार मीठ घालून नीट एकजीव करून घ्यावे .
३)तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत व त्यांना हलक्या हातानी दाबून चपटा आकार द्यावा व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे
व गरमागरम वडे ओल्या खोबर्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत .
४)चटणी तयार करण्यसाठी -चटणीचे सर्व साहित्य घेऊन मिक्सरमधून फिरवून घ्यावे व वड्यांसोबत चटणी सर्व्ह करावी .

]/

साधी खिचडी –

साधी खिचडी –
साहित्य-
१)तांदूळ-३/४ कप
२)मूग दाल-१/२ कप
३)लसून-४ ते ५ पाकळ्या बारीक चिरून
४)हिरव्या मिरच्या -३ बारीक चिरून

mug dal khichadi

५)जिरे-मोहोरी-१ टी स्पून
६)हळद-चिमुटभर
७)कढीपत्ता -४ ते ५ पाने
८)गरजेनुसार तेल
९)चवीनुसार मीठ
१०)सजावटीसाठी कोथिंबीर
कृती-
 
 
 १)प्रथम एका प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून चांगली तडतडू द्यावी त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालावीत तसेच बारीक चिरलेला लसून व हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे व हळद घालून त्यात गरजेनुसार पाणी घालावे.
२)पाण्याला एक उकळी येईल तितक्यात दाल-तांदूळ एकत्र करून धुवून घ्यावेत ,पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात धुतलेले दाल-तांदूळ घालावेत तसेच चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण बंद करावे
३)साधारण २ शिट्ट्या झाल्यानंतर आच बंद  करावी व इक थोड्या वेळात झाकण उघडून त्यात बारीक चिरलेली कोथांबीर घालावी व गरमागरम खिचडी लसून-शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा फक्त वरून गावराणी तूप टाकून खावी .भरली वांगी सोबतही  खिचडी छान लागते
 


आलू पराठा

आलू पराठा
साहित्य-
१)उकडलेले बटाटे -४ ते ५ (मध्यम आकाराचे )
२)गव्हाची कणिक -३ कप
३)हळद-चिमुटभर
४)धणेपूड-१ टी स्पून
५)लाल तिखट-२ टी स्पून
६)चवीपुरते मीठ
७)गरजेनुसार तेल
८)कोथिंबीर
९)आल-लसून पेस्ट-१ टी स्पून
कृती-
१)प्रथम कणकेत थोडे मीठ व तेल घालून कणिक घट्टसर मळून घ्यावी .
२)उकडलेले बटाटे किसून घ्यावेत .एका कढइत तेल गरम करावे तेल गरम झाले कि त्यात आल-लसून पेस्ट ,हळद,धणेपूड,लाल तिखट व किसलेले बटाटे घालावेत व चांगले एकजीव करून घ्यावे
आता यात चवीनुसार मीठ घालावे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करावे व मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे.
३)आता कणकेचा लहान गोळा घ्यावा व छोट्या पुरिएवढा लाटून घ्यावा व यात तयार  बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा व हा गोळा पूर्णपणे झाकला जाईल यारीतीने पुरीचे तोंड बंद करावे .
४)आता ह्या गोळ्याला थोडे पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा व गरम तव्यावर तेल सोडून शेकून घ्यावा .गरम गरम पराठा दही किंवा लसून-शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
 

 

Tag Cloud

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 53 other followers

%d bloggers like this: