आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

तूरदाण्याचे पॅटीज

साहित्य-

१)हिरवे तूर दाणे-१ मोठी वाटी

२)आलं-१ इंच

३)लसूण-५ ते ६ पाकळ्या

४)हिरव्या मिरच्या -२ ते ३

५)कोथींबीर -अर्धी वाटी

६)शेंगदाणा कूट-२ टेबल स्पून

७)बेसन-२ टीस्पून

८)मीठ चवीनुसार

९)तळण्यासाठी तेल

कृती-

१)प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात तूर दाणे,आलं-लसूण,हिरव्या मिरच्या व कोथींबीर घालून थोडे जाडसर दळून घेणे

२)वरील मिश्रणात शेंगदाणा कूट व बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व चवीनुसार मीठ घालावे

३)तयार मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करून गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यत तळावे व  टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे

टीप –

गरम तेलात आधी एक गोळा सोडून पहावा तो तेलात सुटत असेल तर अजून थोडे बेसन कालवावे व नीट एकजीव करून पुन्हा  चपटे गोळे करून टाळून घ्यावे

लहान मुलांना हा प्रकार नक्की आवडेल .

Comments on: "तूरदाण्याचे पॅटीज" (4)

  1. ्दिसायला तर मस्त आहे, आणि रेसिपी बघूनही हे पण न खाता सांगू शकतो की टेस्टी असेलच..

  2. टोमॅटो सॉस पेक्षा हिरव्या पुदीन्याच्या चटणी बरोबर एकद्म बेश्ट लागेल बघा..

  3. वा! या वीकान्तासाठी मला मस्त मेनु मिळाला.

  4. chan chan.
    hyachi hirvi amti pan chan lagate.

यावर आपले मत नोंदवा