आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

कैरीची भाजी

साहित्य-

१)कैरीच्या फोडी-१/२ किलो

२)किसलेला गूळ-४ ते ५ टेबल स्पून

३)अख्खे धणे-१ टी स्पून

४)लाल तिखट-१ ते दीड टी स्पून

५)लसूण पेस्ट-१ टी स्पून

६)तमालपत्र-१

७)जिरे-मोहोरी-१ टी स्पून

८)चवीनुसार मीठ

९)गरजेनुसार तेल

१०)सजावटीसाठी कोथिंबीर

कृती-

१)सर्वात प्रथम एका भांड्यात पाणी गरम करत ठेवावे ,पाणी उकळले कि त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात व साधारण १० ते १५ मिनिट उकडू द्याव्यात .कैरीच्या फोडी नीट शिजल्या कि नाही हे बघण्यासाठी एक फोड पाण्यातून बाहेर काढून दाबून बघावी ,मऊ शिजली असेल तर आच बंद करावी व ह्या कैरीच्या फोडी एका चाळणीत    काढाव्यात व निथळत ठेवाव्यात .

२)आता एका काढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात तमालपत्र घालावे तसेच जिरे-मोहोरी घालून  चांगली तडतडू द्यावी यानंतर त्यात अख्खे धणे घालावेत यानंतर लसूण पेस्ट तसेच हळद व लाल तिखट घालून नीट परतून घ्यावे आता यात कैरीच्या उकडलेल्या फोडी घालून परतून घ्यावे .

३)कैरीच्या फोडी नीट परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे व परतून घ्यावे .आता यात किसलेला गूळ घालून नीट एकजीव करून घ्यावे .भाजीला आता थोडे पाणी सुटल्यासारखे वाटेल ,भाजी पुन्हा एकदा नीट परतून घ्यावी म्हणजे गूळ सर्व भाजीला लागेल .साधारण ५ ते ७ मिनिटात आच बंद करावी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हि भाजी तोंडलावणी म्हणून सर्व्ह करता येईल .

टीप-

१)आजकाल बाजारातच कैरीच्या फोडी विकत मिळतात त्य आणाव्यात किंवा जर कैरीच विकत आणली तर ती धुवून नीट पुसून मग कोयत्याने तिच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात .

२)कैरीच्या फोडी आधीच उकडलेल्या असल्यामुळे त्यांना जास्त शिजवू नये.

Advertisements

Comments on: "कैरीची भाजी" (3)

  1. hyat methi dane jir til mohari bhajun barik karun ghalavi va phodani la pan akhi ghalavi chan flavour yeto

  2. खुप दिवस झाले मेजवानी मिळाली नाही 😦 😦

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: