आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

पावभाजी

प्रमाण-साधारण २ जणांसाठी

साहित्य-

१)लादी पाव -९ ते १०

२)फ्लॉवरचे तुर्रे-पाऊन वाटी

३)मटारचे दाणे-१ वाटी

४)टोमॅटो -४ -२ मध्यम+२ मोठे टोमॅटो बारीक चिरून

पावभाजी

 

५)२ मोठे बटाटे – उकडून -कुस्करून

६)२ मोठे कांदे- बारीक चिरून

७)१ मध्यम आकाराची ढोबळी मिरची- बारीक चिरून  

८)आलं-लसूण-मिरची पेस्ट-१ टेबल स्पून

९)कसुरी मेथी-१ टी स्पून -भाजून

१०)हिंग-१/२ टी स्पून

११)लाल तिखट-दीड टेबल स्पून

१२)धनेपूड-१ टेबल स्पून

१३)मिरपूड-२ चिमूट

१४)चाट मसाला-१/२ टी स्पून

१५)पावभाजी मसाला-२ टी स्पून

१६)बटर+तेल-गरजेनुसार

१७)चवीनुसार मीठ

१८) बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाच्या फोडी

कृती-

१)प्रथम फ्लॉवर ,मटारचे दाणे व २ मध्यम टोमॅटो एकत्र उकडून घ्यावेत व ह्या  भाज्यांचे पाणी निथळून घ्यावे ,पाणी निथळल्यावर ह्या भाज्या चांगल्यां मॅश करून घ्याव्यात .

२)आता एका कढईत तेल आणि बटर गरम करत ठेवावे ,हे गरम झाले कि त्यात हिंग घालावा मग आलं-लसूण-मिरची पेस्ट घालून परतावे व बारीक चिरलेला कांदा घालावा ,कांदा चांगला गुलाबीसर परतला कि त्यात टोमॅटो घालवेत व परतून घ्यावे .

३)यातच आता बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालावी व नीट परतून घ्यावे ,कांदे,टोमॅटो चांगले मऊसर् शिजल्यावर यांत धनेपूड,लाल तिखट,चाट मसाला,मिरपूड व १ टी स्पून पावभाजी मसाला घालून चांगले परतून घ्यावे .

४)आता यांत मॅश केलेल्या भाज्या घालून परतून घ्यावे यातच आता उकडून कुस्करलेले बटाटे घालून नीट एकजीव करून घ्यावे ,चवीनुसार मीठ घालून नीट परतून घ्यावे .भाजी जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात गरजेनुसार पाणी घालावे व साधारण १० मिनिट शिजू द्यावे ,सर्वात शेवटी यांत बटर व पावभाजी मसाला (१टी स्पून)व भाजलेली कसूरी मेथी घालून नीट एकजीव करून घ्यावे ,वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आच बंद करावी .

५)सर्वात आधी प्रत्येक पावला आडवा काप द्यावा .आता एका पसरट तव्यावर थोडे बटर घालावे बटर गरम झाले कि त्यात चिमुटभर हळद,लाल तिखट व २ चिमूट पावभाजी मसाला घालून हे मिश्रण तव्यावर नीट पसरवून घ्यावे व या मिश्रणात आडवा काप दिलेले पाव एकानंतर एक असे  आतून व बाहेरून नीट शेकून घ्यावेत.

६)आता एका प्लेटमध्ये पावभाजीसाठी तयार केलेली भाजी घ्यावी त्यावर बारीक चिरलेला कांदा व बटर घालावे सोबत लिंबाची फोड व वरीलप्रमाणे शेकलेले पाव ठेवून पावभाजी सर्व्ह करावी . 

Comments on: "पावभाजी" (4)

  1. kupach chan

  2. sheetal narayan salunke said:

    i like it very much and thank u so much

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: