आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

साहित्य-

कोफ्त्यांसाठी –

१)किसलेले पनीर – १ वाटी

 २)उकडलेला बटाटा-१ मोठा

३)काजूचे तुकडे-२ टेबल स्पून

४)कोर्नफ्लोर -दीड टेबल स्पून

कोफ्ते

५)भाजून कुटलेली बडीशेप-१ टी स्पून

६)लिंबाचा रस-१ टी स्पून

७)लाल तिखट-१ टी स्पून

८)चवीनुसार मीठ

९)गरजेनुसार तेल

करीसाठी-

१)कांदा-टोमॅटो प्युरी

२)मक्याचे कणीस -१ मध्यम आकाराचे

३)हळद-चिमुटभर

४)धनेपूड-१ टी स्पून

५)लाल तिखट – १ टेबल स्पून

६)मिरपूड-चिमुटभर

७)आलं-लसून पेस्ट-१ टी स्पून

८)जिरेपूड-१/२ टीस्पून

९)गरजेनुसार तेल किंवा बटर

१०)चवीनुसार मीठ

कृती-

१)ग्रेव्हीसाठी आधी १ मध्यम कांदा व १ मोठा टोमॅटो यांना उकडून त्यांची प्युरी बनवून घ्यावी .तसेच मक्याचे दाणे काढून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यात घ्यावेत त्यात थोडे कोमट पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे व त्यातील रस गाळून घ्यावा, उरलेल्या चोथ्यातही थोडे पाणी घालून त्यातीलाही रस पिळून गाळून घ्यावा .

२)एका कढईत तेल किंवा बटर गरम् करत  ठेवावे नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे आता यांत कांदा-टोमॅटो प्युरी घालून थोडा वेळ परतू द्यावे नंतर यांत हळद,धनेपूड,लाल तिखट,मिरपूड घालून परतून घ्यावे व मक्याचा रस घालून नीट ढवळून घ्यावे .चवीनुसार मीठ घालूण ढवळून घ्यावे व ग्रेव्हीला उकळी येईल तितक्यातच कोफ्ते तयार करून घ्यावेत .

३)एका बाउलमध्ये किसलेले पनीर घ्यावे त्यात उकडलेला बटाटा किसून घ्यावा आता यातच काजूचे तुकडे,बडीशेप पूड ,लिंबाचा रस ,लाल तिखट व चवीनुसार मीठ तसेच कोर्नफ्लोर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे .

४)वरील तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून गरम तेलात गोल्डन ब्राऊन कलरवर तळून  घ्यावेत. तितक्यातच ग्रेव्हीलाही १ ते २ उकळी आलेली असेल तेव्हा आच बंद् करावी व बारीक चिरलेली कोथींबीर घालावी .

५)एका सर्व्हिंग डीशमध्ये आधी कोफ्ते ठेवावेत व त्यावर वरील तयार ग्रेव्ही घालावी व वरून थोडे किसलेले पनीर घालून सर्व्ह करावे .सोबत ब्रोकोली सलाड सर्व्ह करावे

टीप-

१)हवे असल्यास ग्रेव्ही आधी करून ठेवावी व ऐनवेळी कोफ्ते तळल्यानंतर ग्रेव्ही थोडी गरम करून घ्यावी .सोबत

सर्व्ह करावे

२)आवडत असल्यास  ग्रेव्हीत वरून थोडे फ्रेश क्रीमही घालू शकतात .

३)ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत असल्यास त्यात थोडे गरम पाणी घालून एक उकळी काढावी

पनीर कोफ्ता कोर्न करी

Comments on: "पनीर कोफ्ता विथ कॉर्ण ग्रेव्ही" (2)

  1. photo khup chan aahe test sudha chanch asel as vatate
    mi nakki try karen.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: