आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

हरी भरी टिक्की

साहित्य-

१)उकडलेले बटाटे -२ मध्यम आकाराचे

२)उकडलेले मटार -अर्धी वाटी

३)१ जुडी पालक

४)बारीक चिरलेली कोथींबीर-अर्धी वाटी

हरी भरी टिक्की

५)आलं-लसूण-हिरवी मिरचीचे वाटण-१ टेबल स्पून

६)शेंगदाणा कूट -२ टी स्पून

७)कॉर्नफ्लोअर् -२ टेबल स्पून

८)लिंबाचा रस-१ टी स्पून

९)चवीनुसार मीठ

१०)गरजेनुसार तेल

पूर्वतयारी-

१)प्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावे ,पाणी उकळले कि त्यात खुडलेला पालक घालावा व साधारण ५ मिनिटांत आच बंद करून पालक एका चाळणीत निथळत ठेवावा ,पाणी निथळल्यावर पालक हाताने दाबून त्यातले जास्तीचे पाणी काढून टाकावे व तयार पालक बारीक चिरून घ्यावा .

२)मटार उकडून घ्यावे व त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यावे व हे मटार मिक्सरमधून जाडसर दळून घ्यावेत .

कृती-

१)एका बाउलमध्ये  उकडून किसलेला बटाटा घ्यावा त्यातच जाडसर दळलेला मटार ,कोथींबीर,शेंगदाणा कूट,आलं-लसूण-हिरवी मिरचीचे वाटण घालून एकजीव करून घ्यावे .

२)आता यांत बारीक चिरलेला पालक घालावा तसेच लिंबाचा रस ,कॉर्नफ्लोअर् व चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे .

३)आता या तयार पीठाचे गोल गोळे बनवून त्यांना चपटा आकार द्यावा व गरम तेलात गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यावेत व टोमेटो सॉस किंवा रेड चिली सॉस बरोबर सर्व्ह करावेत .

टीप-

आधी तेलात एक टिक्की सोडून पहावी  ती सुटत असेल तर पीठात अजून थोडे कॉर्नफ्लोअर् घालावे .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: