आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

कणकेचा शिरा

साहित्य

१)पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक

२)पाव वाटी तूप

३)अर्धी वाटी साखर

४)१ ते दीड वाटी दूध

शिरा

५)आवडीप्रमाणे सुका मेवा

टीप-

मी यांत खारीक-खोबरे,काजू-बदाम हे सर्व जिन्नस मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊन हा कूट शिऱ्यासाठी वापरला होता .

कृती-

१)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व चांगले परतून घ्यावे .मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास अजून थोडे तूप घालावे .कणिक चांगली लालसर परतून घ्यावी .

२)कणिक चांगली लालसर झाली कि त्यात १ ते दीड वाटी गरम दूध घालावे व लगेचच साखर घालावी व चांगले परतून घ्यावे .आता  लगेचच यांत सुका मेवा घालून परतून घ्यावे .

३)शिरा खाली चिटकू शकतो म्हणून सतत परतत रहावे ,दूध घातल्यानंतर साधारण ५ मिनिटातच कणिक आळायला लागते म्हणजेच समजावे कि  शिरा तयार झालेला आहे लगेच आच बंद करून गरमागरम शिरा सर्व्ह करावा .

टीप-

१)या शिऱ्यासाठी आपण साधी पोळ्यांची कणिकही वापरू शकतो पण त्यासाठी ही कणिक खूप जास्त भाजावी लागते नाहीतर शिरा एकदम चिकट येतो .

२)कणिक चांगली लालसरच भाजली गेली पाहिजे नाहीतर शिऱ्याची चव बिघडण्याची शक्यता असते .

Advertisements

Comments on: "कणकेचा शिरा" (3)

  1. काल करून बघितला हा शिरा…मस्त तूप ओतून खाल्ला 😉 छान लागतो…
    मला जेवण करायची प्रचंड आवड आहे, त्यामुळे सगळ्या खादाडी ब्लॉगवर सुझे सापडेलच… अजुन येऊ द्यात पाककृती 🙂

  2. Classic.I can eat atleast 2 Kg after i do enough Gym. Let me try this on week end.

    Tarzan N.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: