आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

व्हेज पुलाव

साहित्य-

 १) बासमती तांदूळ-१ वाटी (मध्यम आकाराची )

२)मटाराचे दाणे-२ टेबल स्पून

३)बारीक चिरलेला गाजर-१ टेबल स्पून

४)बारीक चिरलेली फरसबी -१ टेबल स्पून

५)बारीक चिरलेली भोपळी मिरची -१ टेबल स्पून

६)२ हिरव्या मिरच्या -बारीक चिरून

७)आलं-लसूण पेस्ट -१ टी स्पून

८)२ माध्याम आकाराचे कांदे-पातळ उभे काप करून

८)१ छोटा टोमेटो बारीक चिरून

व्हेज पुलाव

९)चिमुटभर हळद

१०)बिर्याणी/पुलाव मसाला-१/२ टी स्पून

११)जिरे-मोहोरी

१२)चवीनुसार मीठ

१३)गरजेनुसार तेल

१४)काजूचे तुकडे -७ ते ८

पूर्वतयारी-

१)तांदूळ धुवून पाण्यात अर्धा ते पाऊन  तास भिजत  घालावेत .त्यानंतर एका भांड्यात थोडे जास्तीचे पाणी घेऊन ते उकलण्यास ठेवावे ,पाणी उकळले कि त्यात धुवून भिजवलेला तांदूळ घालावा .साधारण ९०% शिजवावा व त्यानंतर एका चाळणीत हा तयार भात टाकावा म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल ,पाणी निथळल्यावर तयार भात एका ताटात काढून  थंड होऊ द्यावा म्हणजे त्याची शिते मोकळी होतील

२)एका भांड्यात पाणी उकळायला ठेवावे ,पाणी उकळले कि त्यात मटार,गाजर व फरसबी घालून २ मिनिटांत आच बंद करावी व ५ मिनिट त्या भाज्या गरम पाण्यातच राहू द्याव्या त्यानंतर एका चाळणीत निथळण्यास ठेवाव्यात . 

कृती

१)एका पॅनमध्ये  तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून तडतडू द्यावी त्यानंतर यांत पातळ उभा चिरलेला कांदा घालावा व चांगला गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा .नंतर टोमेटो व हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे तसेच काजूचे तुकडेही घालून परतून घ्यावेत .

२)आता यांत आलं-लसूण पेस्ट घालावी तसेच उकडलेल्या भाज्या घालाव्यात व परतून घ्यावे यातच भोपळी मिरची घालावी तसेच हळदही घालावी व परतून घ्यावे

३)यातच तयार भात घालून नीट हलक्या हाताने परतून घ्यावे नाहीतर भाताची शिते मोडली जातील .भात नीट परतून झाला कि त्यात चवीनुसार मीठ घालावे व बिर्याणी /पुलाव मसाला घालून पुन्हा नीट परतून घ्यावे  .एक वाफ काढून आच बंद करावी शेवटी बारीक चिरलेली कोथींबीर घालून रायत्याबरोबर  सर्व्ह पुलाव सर्व्ह करावा .

टीप

आवडत असल्यास वरून तळलेला कांदा घालू शकतात तसेच खडा गरम मसालाही घालू शकतात पण पुलाव खातांना  तो अख्खा मसाला  अडथळा आणतो पण आपण यांत पुलाव मसाला घातला आहे तोही छानच चव देतो .

Advertisements

Comments on: "व्हेज पुलाव" (4)

  1. KHOOP CHAN RECEIPE AAHE

  2. Mi karun Bhaghen

  3. Mala Receipe khoop aawadali me nakkich karun bhaghen.

    Manisha Lohote

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: