आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

स्प्राऊट सलाड

 

साहित्य-

१)मोड आलेली मटकी -१/२ वाटी  

२)मोड आलेले मूग -१/२ वाटी

३)बारीक चिरलेला कांदा-१

स्प्राऊट सलाड

४)बारीक चिरलेला टोमेटो-१

५)लिंबांचा रस -२ टेबल स्पून

६)मिरपूड -२ चिमूट

७)डाळिंबाचे दाणे १ टेबल स्पून

८)काळे द्राक्ष -४ ते ५

९)चाट मसाला -१ टी स्पून

१०)तेल-१/२ पळी

११)मीठ चवीनुसार

कृती-

१)सर्वात प्रथम मोड आलेले मूग व मटकी उकडून घ्यावे त्यासाठी कुकरमध्ये खाली पाणी टाकावे व कुकरच्या डब्यात मूग व मटकी टाकावी त्यात पाणी घालू नये झाकण लावून मंद आचेवर ठेवावे व १ शिटी होण्याच्या आतचं आच बंद करावी .

२)आता एका बाउलमध्ये मूग व मटकी घ्यावी त्यात बारीक चिरलेला कांदा,टोमेटो घालावा व चांगले मिक्स करून घ्यावे आता यांत तेल,लिंबाचा रस व मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे   यातच आता मिरपूड व चाट मसाला घालावा व चांगले एकजीव करून घ्यावे

३)आता यांत डाळींबाचे दाणे व काळ्या द्राक्षाच्या फोडी घालाव्यात तसेचं थोडी कोथींबीर घालून सलाड थोडे मुरू द्यावे व सर्व्ह करावे .

टीप-

१)मूग व मटकीला मोड आणण्यासाठी -मूग व मटकी सकाळी पाण्यात भिजत घालावी व संध्याकाळी किंवा रात्री पाण्यातून उपसून घ्यावी व एका चाळणीत पाणी निथाळायला ठेवावे  ,पाणी निथळले कि मूग किंवा मटकी एका सुती कापडात घट्ट बांधून घ्यावी व रात्रभर एका हवाबंद डब्यात झाकण लावून ठेवावे सकाळी कापडाची गाठ सोडून पाहाल तर मोड आलेले असतील .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: