आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

साहित्य-

१)७ ते ८ कोवळी वांगी

२)शेंगदाणा कूट-२ टेबल स्पून

३)किसलेले ओले खोबरे-१ टेबल स्पून

बेंगन ग्रीन मसाला

४)लसूण-७ ते ८ पाकळ्या

५)हिरव्या मिरच्या -३ ते ४

६)कोथींबीर-अर्धी वाटी

७)जिरे-मोहोरी-१/२ टी स्पून

८)चवीनुसार मीठ

९)गरजेनुसार तेल

कृती-

१)प्रथम शेंगदाणा कूट ,ओले खोबरे.लसूण ,हिरवी मिरची,कोथींबीर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यावे व चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यावी .

२)वांगी बारीक चिरून मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे

३)एका काढईत तेल गरमं करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून तडतडू द्यावी त्यानंतर वर तयार केलेला मसाला (१) घालावा व चांगले परतून घ्यावे साधारण ५ ते ७ मिनिट परतल्यावर त्यात वांग्याचे तुकडे घालून पुन्हा परतून घ्यावे .

४)वांग्याचे तुकडे थोडा वेळ तेलात शिजू द्यावे त्यानंतर त्यात १ ते दीड वाटी गरम पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून शिजू द्यावे .वांगे शिजले आहेत हे बघण्यासाठी वांग्याच्या देठाकडील तुकडा दाबून पहावा शिजला असेल तर आच बंद करावी व गरमागरम भाजी सर्व्ह करावी .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: