आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

रसमलाई

साहित्य-

१)दीड लिटर दूध

२)कण्डेन्स्ड मिल्क -२ टेबल स्पून (ऐच्छिक)

rasmalai

३)साखर-  अंदाजानुसार

४)बदाम व पिस्त्याचे काप -आवडीनुसार

५)केशरच्या काड्या -७ ते ८ (ऐच्छिक)

६)लिंबाचा रस किंवा व्हिनेगर -१ टी स्पून

कृती-

१)प्रथम पाऊन लिटर दूध एका भांड्यात घ्यावे व दूध  तापवायला ठेवावे दुधाला एक उकळी आली कि त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालावा व हलवून घ्यावे थोड्याच वेळात चोथा पाणी वेगळे झालेले दिसेल लगेच यांत थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडे घालावेत व चाळणीवर सुती रुमाल टाकून पनीर गाळून घ्यावे .

२)पनीर टाकलेला सुती रुमाल हातानेच जरा पिळून घ्यावा म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाईल .आता हा रुमाल बेसिनच्या वर एका नळाला टांगून ठेवावा म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाईल .साधारण १ तास टांगून ठेवावे .

३)आता दुसरीकडे एका भांड्यात दूध आटवायला ठेवावे दूध जवळपास निम्मे व्हायला आल्यावर त्यात कण्डेन्स्ड मिल्क घालावे व ढवळून घ्यावे व साखर घालून पुन्हा ढवळून घ्यावे तसेच केशराच्या काद्याही घालाव्यात  .हे  आपल्या नेहमीच्या बासुंदीपेक्षा थोडे घट्ट असायला हवे म्हणून दूध बासुंदीपेक्षा थोडे घट्ट झाल्यास लगेच आच बंद करावी

४) एका भांड्यात १ वाटी साखर व साधारण ४ ते ५ वाट्या पाणी घालावे व उकळायला ठेवावे .आता टांगून ठेवलेले पनीर काढून घ्यावे व ते कापडातून बाहेर न काढताच कणकेसारखे मळून घ्यावे ,तयार मळलेल्या पनीरचे छोटे छोटे जरा चपटे  गोळे करावेत तयार गोळे ह्याप्रमाणे दिसतील –

५)आता आपण जे साखर व पाण्याचे मिश्रण उकळायला ठेवले आहे ते उकळले कि त्यात पनीरचे गोळे सोडावेत व झाकण लावून साधारण १० ते १२ मिनिटे उकळू द्यावे ,पनीरच्या गोळ्यांचा आकार वाढलेला असेल .आता हे गोळे बाहेर काढावेत व कोमट पाण्यात ठेवावे

६)आता कोमट पाण्यात ठेवलेले गोळे बाहेर काढावेत व हलक्या हातांनी दाबून त्यातील पाणी काढून घ्यावे व एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार पनीरचे गोळे ठेवावेत व त्यावर तयार बासुंदी घालावी तसेच बदाम पिस्त्याचे काप घालावेत साधारण १० मिनिटांत बासुंदी पनीरच्या गोळ्यात मुरेल म्हाणून १० मिनिटात रसामलाईचा आनंद लुटावा .

टीप-

कण्डेन्स्ड मिल्कमुळे दुधाला लवकर घट्टपणा येतो व थोडा गोडसरपणाही येतो म्हणून साखरही बेतानेच घालावी व कण्डेन्स्ड मिल्क घातल्यानंतर जास्त वेळ दुधाला उकळू नये .

२)दूध जास्त घट्ट झाल्यास त्यात थोडे गरम दूध टाकून एक उकळी काढावी .रसमलाईचे दूध जास्त घट्ट असू नये नाहीतर ते पनिरमध्ये मुरणार नाही .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: