आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

सोलकढी

साहित्य-

१)नारळाचे दूध-३ वाट्या

२)आमसूल-७ ते ८सोलकढी

३)आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट-दीड टॆ.स्पून

४)सैंधव मीठ (काळे मीठ)-चवीनुसार

५)कोथींबिर

पूर्वतयारी-

१)आमसूल भिजविणे-

एका वाटीत कोमट पाणी घ्यावे व त्यात आमसूल टाकावे ,साधारण अर्धा तास तरी भिजु द्यावेत अर्धा तासाने  आमसूल त्याच वाटीत कुस्करून घ्यावे.

२)नारळाचे दूध काढणे-

सर्व प्रथम नारळ किसून घ्यावा ,हे किसलेले ओले खोबरे थोडे कोमट पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे व एका भांड्यात गाळून घ्यावे .एका नारळातून साधारण ३ ते ४ वाट्या दूध निघते.

कृती-

१)एका भांड्यात नारळाचे दूध घ्यावे त्यात कुस्करलेले आमसूल गाळून घ्यावे , गाळणीत उरलेल्या गाळात पुन्हा थोडे नारळाचे दूध टाकून ते पुन्हा गाळून घ्यावे आता नारळाच्या दुधाचा रंग थोडा गुलाबीसर होईल.

२)आलं-लसूण व मिरची एकत्र कुटुन घ्यावे व त्यात थोडे पाणी घालून तेही नारळाच्या दुधात गाळून घ्यावे आता यात  चवीनुसार काळे मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून  सोलकढी सर्व्ह  करावी.

टीप-

आवडत असल्यास थोडी जिरेपूड वरून भुरभुरावी.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: