आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

मिक्स व्हेज स्पेशल

साहित्य-

१)पनीर -१०० टे १५० ग्राम

२)मटारचे दाणे-२ टेबल स्पून

३)फ्लॉवरचे तुर्रे -२ टेबल स्पून

४)फरसबी बारीक चिरलेली -१ टेबल स्पून

५)बारेक चिरलेला गाजर -२ टेबल स्पून

मिक्स व्हेज

६)काजू -९ ते  १०

७)भाजलेली तीळ -१ टेबल स्पून

८)कांदा-टोमेटो प्युरी -१ वाटी

९)आलं-लसूण पेस्ट – १ टी स्पून

१०)हळद-१/४ टेबल स्पून

११)लाल तिखट-२ टी स्पून

१२)धनेपूड-१ टी स्पून

१३)गरम मसाला-चिमुटभर

१४)१ छोटी बारीक चिरलेली सिमला मिरची

१५)१ बारीक चिरलेला कांदा

१६)१ बारीक चिरलेला टोमॅटो 

१७)गरजेनुसार तेल

१८)चवीनुसार मीठ

पूर्वतयारी-

१)कांदा -टोमेटो प्युरी तयार करून घेणे –

कांदा -टोमेटो प्युरी कशी बनवावी हे पालक पनीर व मटार पनीर या रेसेपीत दिलेले आहे .

२)काजू व तिळाची पेस्ट बनविणे –

कोमट पाण्यात काजू साधारण अर्धा तास भिजत घालावेत त्यानंतर भाजलेली तीळ व काजू एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यावे .

कृती-

१)एका काढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि जिरे-मोहोरी घालावी टी तडतडली कि त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी तसेच बारीक चिरलेला कांदा व टोमेटो घालून  परतून घ्यावे आता यातच काजू व तिळाची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे

२)काजू-तिळाची पेस्ट चांगली परतल्यानंतर त्यात कांदा-टोमाटो प्युरी घालावी व चांगले ४ ते ५ मिनिट परतून घ्यावे  आता यांत हळद.धनेपूड,लाल तिखट,गरम मसाला घालावा व परतून घ्यावे

३)पनीर व सिमला मिरची सोडून बाकी सर्व भाज्या घालाव्यात व परतून घ्यावे ,भाज्या थोडा वेळ तेलातच शिजू द्याव्यात त्यानंतर त्यात गरजेनुसार गरमं पाणी घालावे तसेच चवीनुसार मीठ घालावे व झाकण लावून शिजू द्यावे

४)भाज्या शिजण्यात आल्या कि त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची घालून परतून घ्यावे व नंतर त्यात डीप फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालावेत व हलक्या हाताने परतून घ्यावे नाहीतर पनीरचे तुकडे तुटू शकतात ३ ते ४ मिनिटांत आच बंद करावी बारीक चिरलेली कोथींबीर घालून व वरून लिंबू पिळून डीश सर्व्ह करावी .

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: