आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

सुरळीच्या वड्या

या पाटोळ्यान्साठी तीन प्रकारचे मसाले तयार कारावे लागतात.

साहित्य :
अ) सारणासाठी :

सारण मसाला

१)कान्दे २ मध्यम आक़ारचे
२)१ वाटी खोबरयाचा किस
३) खसखस १ चमचा
४) तीळ १ चमचा
५)धणे पुड १/२ चमचा
६)गोडा मसाला पाव चमचा
७)मीठ गरजेनुसार
८) तेल गरजेनुसार

 

ब) पाटोळ्यान्साठी :

पाटोळी मसाला१)१ वाटी बेसन,

१)१ वाटी बेसन २)लसून पाकळ्या ३ ते ४
३) जिरे १/२ चमचा
४)लाल मिरची पावडर १ चमचा
५)हळद चिमुटभर
६)मीठ गरजेनुसार
७) तेल गरजेनुसार

 

 

 

क) रस्यासाठी :

रस्सा मसाला

१)कान्दे २ मध्यम आक़ारचे,
२) १ वाटी खोबरयाचा किस,
३)लसुण पाकळ्या ३ ते ४
४)लाल मिरची पावडर १ चमचा ,
५)हळद चिमुटभर ,
६) धणे पुड १/२ चमचा ,
७) गोडा मसाला पाव चमचा,
७)मीठ गरजेनुसार ,
८)तेल गरजेनुसार

 

पूर्वतयारी

अ) सारणाचा मसाला : –

सारणाचा तयार मसाला

प्रथम कांदे किसून घ्यावे व ते तव्यावर लाल होईपर्यंत परतून घ्यावे, नंतर त्यात किसलेले सुके खोबरे टाकून कांद्यासोबत परतून घ्यावे. नंतर त्यात खसखस, तीळ, मीठ, धणेपूड, गोडामसाला टाकावा. वरून थोडे तेल टाकावे सर्व एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे. हा सारणाचा मसाला तयार झाला.

 

 

 

 

ब)  पाटोळ्या मसाला : –

पाटोळी तयार मसाला

लसून पाकळ्या, जिरे , लाल मिरची पावडर, हळद , मीठ सर्व एकत्र करून मिक्सर मधून बारीक करावे.

 

 

 

 

 

 

क) रस्सा मसाला :-

रस्सा तयार मसाला

प्रथम कांदे भाजून घ्यावे , खोबरयाचा कीस तव्यावर भाजून घ्यावा. मग भाजलेले कांदे खोबरयाचा किस, लसुण, लाल मिरची पावडर, हळद, गोडामसाला, धणेपूड हे सर्व मिश्रण मिक्सर मधून बारीक करावे.

 

 

 

 

 

कृती :-
१.पाटोळ्या:- कढईमधे तेल टाकून त्यात पाटोळ्या  मसाला टाकावा. नंतर त्यात १ वाटी पाणी घालावे.पाण्याला उकळी आल्यावर त्यात १ वाटी बेसन घालावे व ते चमच्याने ढवळत राहावे (घेरून घ्यावे) . नाहीतर त्यात गुठळ्या पडण्याची शक्यता असते. पाण्याची गरज वाटल्यास गरम पाणी वापरावे.

सारण भरताना

नंतर मऊसर शिजल्यावर तेलाचा हात लावून त्याचे छोटे गोळे करावे व ते चपातीसारखे लाटून घ्यावे.नंतर सारणाचा मसाला पसरवून फोटोत दाखवल्याप्रमाणे घडी करून घ्यावी व सुरीने छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.लाटलेली पाटोळी

 

 

 

२. रस्सा :- रस्स्यासाठी तयार केलेला मसाला कढईत तेलात परतून घ्यावा.त्यात थोडे बाजरीचे पीठ घालावे म्हणजे रस्सा दाट होईल.चवीपुरता मीठ घालावे. गरजेपुरता पाणी घालावे. मंद आचेवर ५ मि. शिजू ध्यावे.वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.

तयार पाटोळी

तयार रस्सा

टीप :- पाटोळ्या नुसत्याच छान लागतात, किंवा रस्स्यात टाकून गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खाव्यात.

Advertisements

Comments on: "सातपुडाच्या पाटोळ्या ( सुरळीच्या वड्या )" (1)

  1. Ekdum sahi vaa !
    tondala pani sutlay.
    hi recipe vismaranat geli hoti kiva small version ne karat hote thanks parat sangitalya baddal.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: