आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

चिकन फ्राय

साहित्य-

१)चिकन -२०० ग्राम

२)२ मध्याम कांदे -उभे चिरलेले

३)अर्धा वाटी सुके खोबरे -किसलेले

४)आलं-लसूण -मिरची पेस्ट-२ टी स्पून

चिकन फ्राय

५)लिंबाची किसलेली साल-१/२ टी.स्पून

६)हळद-१/४ टे, स्पून

७)धनेपूड -१/२ टी स्पून

८)लाल तिखट-दीड टी स्पून

९)गरम मसाला -१/२ टी स्पून

१०)चिकन स्टोक-५ टेबल स्पून

११)गरजेनुसार तेल

१२)चवीनुसार मीठ

१३)सजावटीसाठी कोथींबीर

पूर्वतयारी –

१)चिकन हंडीच्या रेसेपीमध्ये दिल्याप्रमाणे चिकन शिजवून चिकन स्टोक तयार करून घ्यावा कारण यातीलच उकडलेले चिकनचे पीसेस व चिकन स्टोक आपल्याला चिकन फ्रायसाठी वापरायचा आहे  .

२)कांद्याचे पातळ उभे काप करून टे गरम तेलात डीप फ्राय करून घ्यावेत

३)किसलेले सुके खोबरे तव्यावर सोनेरी रंगावर भाजून घ्यावे व थोडे गार झाल्यावर चुरून घ्यावे .

कृती-

१)एका कढईत तेल गरम करायला ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट घालावी तसेच तळलेला कांदा घालून नीट परतून घ्यावे यातच भाजून चुरलेले खोबरे घालावे व परतून घ्यावे

२)आता यांत हळद,धनेपूड,लाल तिखट व गरम मसाला घालून नीट परतून घ्यावे व लिंबाची किसलेली साल घालावी

३)आता यांत उकडलेले चीकनचे पीसेस घालून चांगले एकजीव करून घ्यावे चवीनुसार मीठ घालून परतून घ्यावे व यांत चिकन स्टोक घालून पुन्हा परतून घ्यावे व झाकण लावून एक वाफ काढावी साधारण ५ मिनिटांतचं एक वाफ निघेल त्यानंतर आच बंद करावी वरून लिंबू पिळून बारीक चिरलेली कोथींबीर भुरभुरावी व गरमागरम सर्व्ह करावे .

टीप –

यांत तळलेला कांदा व भाजलेले खोबरे एकत्र दळूनही घालू शकतात .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: