आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

खानदेशी छोले मसाला

साहित्य-

१)काबुली चणे – १ छोटी वाटी

२)२ मध्यम कांदे -बारीक चिरलेले

३)१ टोमाटो-बारीक चिरलेला

४)आलं-लसूण पेस्ट – १ टी स्पून

चणा मसाला

५)हळद-१/२ टी स्पून

६)धनेपूड-१ टी स्पून

७)लाल तिखट-२ टी स्पून

८)चिमुटभर -गरम मसाला

९)छोले मसाला -१ टेबल स्पून

१०)भाजलेल्या तिळाचं कूट -२ टेबल स्पून

११)तमालपत्र-१

१२)कढीपत्ता

१३)कोथींबीर

१४)चवीनुसार मीठ

१५)गरजेनुसार तेल

१६)जिरे-मोहोरी

पूर्वतयारी-

१)काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे सकाळी चणे उपसून घ्यावे.

२)एका प्रेशर कुकरमध्ये चणे शिजण्यास टाकावे त्यासोबतच एका छोट्या सुती कापडात साधारण १ टेबल स्पून चहा पावडर बांधून टी कापडाची पोटली ह्या चाण्यांसोबतचं शिजवायला टाकावी म्हणजे चण्याचा रंग कायम राहतो .साधारण ३ शिट्ट्यांत चणे शिजलेले असतात .

३)एका गरम तव्यावर तीळ भाजून मिक्सरमधून फिरवून घ्यावे .

कृती-

१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून ती तडतडू द्यावी यानंतर त्यात तमालपत्र व कढीपत्ता घालावा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे

२)कांदा चांगला गुलाबीसर परतून झाला कि त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी तसेच टोमॅटो घालून परतून घ्यावे

३)आता यांत हळद ,धनेपूड,लाल तिखट,गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे ,यातच शिजवलेले चणे घालावेत व चांगले एकजीव करून घ्यावे

४)गरजेनुसार पाणी घालून ढवळून घ्यावे ,चवीनुसार मीठ घालावे तसेच तिळाचा कूट घालून ढवळून घ्यावे व साधारण ५ ते ७ मिनिटांत त्यात छोले मसाला घालून नीट ढवळून घ्यावे

५)५ मिनिटांत आच बंद करावी व वरून बारीक चिरलेली कोथींबीर घालावी ,लिंबाची फोड ठेवून गरमागरम पुरीसोबत गरमागरम छोले सर्व्ह करावे .

 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: