आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

इन्स्टन्ट खमण ढोकळा

साहित्य-

१)बेसन-१ वाटी (मध्यम आकाराची )

२)साखर-१ टेबल स्पून

३)खाण्याचा सोडा-१/२ टी स्पून

खमण ढोकळा

४)सायट्रिक असिड क्रीस्टाल-३/४ टी स्पून

५)इनो -१/२ टी स्पून

६)चवीनुसार मीठ  

फोडणीसाठी

१)मोहोरी

२)हिंग

३)कढीपत्ता

४)तेल

सजावटीसाठी कोथींबीर

कृती –

१)प्रथम मिक्सरच्या एका पॉटमध्ये दिलेल्या प्रमाणानुसार बेसन,साखर,सोडा,सायट्रिक असिड क्रिस्टल ,इनो व चवीनुसार मीठ घालून मिक्सारामधून फिरवून घ्यावे .

२)एका कढइत किंवा खोल भांड्यात पाणी गरम करत ठेवावे त्यावर नंतर ढोकळे वाफावाता येतील

३)वरील तयार मिश्रणात साधारण १ ते दीड वाटी पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे ,पाणी घातल्यानंतर मिश्रण फसफासायाला लागते तेव्हा लगेच हे मिश्रण तेलाचा हात लावलेल्या एकां ताटात ओतून घ्यावे

४)ज्या कढईत पाणी गरम करण्यास ठेवले आहे त्यावर एक जाळी ठेवावी व त्यावर मिश्रण ओतलेला ताट ठेवावा व कढईवर झाकण ठेवावे व मध्यम आचेवर साधारण १० ते १२ मिनिट ठेवावे ढोकळा झाला आहे कि नाही हे बघण्यासाठी त्यात सुरीणे टोचून बघावे ,जर मिश्रण सुरीला चिकटले नाही तर ढोकळा झाला असे समजावे व आच बंद करावी

५)एका छोट्या कढईट किंवा वाघारीयात तेल गरम करावे व त्यात मोहोरी चांगली तडतडली कि हिंग व कढीपत्ता घालून ही फोडणी ढोकळयावर घालावी ,सुरीने चौकोनी तुकडे करून पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावे .

टीप-

ढोकळा वाफाविताना काढईतील पाण्याची पातळी त्यात ठेवलेल्या जाळीच्या खालोखाल असावी व मिश्रण ओतलेले भांडे त्यात नीट बसलेले असेल याची काळजी घ्यावी नाहीतर वाफेने ते पे होईल व आतल्या मिश्रणात पाणी घुसेल.

Advertisements

Comments on: "इन्स्टन्ट खमण ढोकळा" (2)

  1. it’s awesome recipe

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: