आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

भरली वांगी

 

भरली वांगी

साहित्य-

 

१)काटेरी वांगी -५ ते ६

२)शेंगदाणा कूट -१ वाटी

३)खोबऱ्याचा किस -२ टे.स्पून

४)आलं-लसूण पेस्ट -१ टे.स्पून

भरली वांगी

५)लाल तिखट -दीड टे.स्पून

६)धनेपूड – १ टे.स्पून

७)हळद-१/४ टे.स्पून

८)जिरे-१/२ टे.स्पून

९)मोहोरी-१/२ टे.स्पून

१०)तमालपत्र-१

११)कढीपत्ता

१२)चवीनुसार मीठ

१३)गरजेनुसार तेल

कृती –

१)प्रथम वांग्याचे काटे काढून त्यांना सुरीने आडवे व उभे काप द्यावेत( म्हणजे त्यात मसाला नीट भरता येईल ) व मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे .

२)एका बाउलमध्ये शेंगादाण्याचा कूट घ्यावा त्यात खोबऱ्याचा किस ,आलं-लसूण पेस्ट, हळद,लाल तिखट,धनेपूड व चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे ,वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार आहे.

३)एका प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करत ठेवावे तेल गरम होईल तितक्यातच तयार मसाला वांग्यात चांगला दाबून दाबून भरून घ्यावा ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालावी ,जिरे-मोहोरी तडतडली कि त्यात तमालपत्र तसेच कढीपत्ता घालावा  व लगेचच त्यात मसाला भरलेले वांगे हळुवारपाणे ठेवावेत .

४)वांगे तेलात चांगले ५ मी.परतून घ्यावेत व वांगे अर्धे बुडतील इतपत गरम पाणी घालावे व प्रेशर कुकरचे झाकण लावून घ्यावे ,१ शिटी झाल्यावर आच बंद करावी व कोथींबीर घालून गरमागरम पोळी किवा साध्या मुगाच्या डाळीच्या खिचाडीसोबत सर्व्ह करावे .

Comments on: "भरली वांगी" (2)

  1. पुनः तेच. अहो अशा पदार्थांची माहिती टाकू नका. तोंडाला पाणी सुटत न. काही तरी नवीन पदार्थांची माहिती टाका जी खाल्ली नसावीत कोणी. असो ब्लॉग छान आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: