आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

श्रीखंड

साहित्य-

१)दही -५०० ग्राम

२)पिठी साखर-१ मध्यम वाटी

३)केशर काड्या-१० ते १२

४)इलायची पूड -१/४ टे.स्पून

५)दूध-१ टे .स्पून

पूर्वतयारी-

१)प्रथम दही एका सुती कापडात बांधूनघ्या व एका नळाला बेसिनवर  टांगून द्या फोटोत दाखविल्याप्रमाणे –

साधारणपणे ५ टे ६ तास हे टांगलेले ठेवावे जेणेकरून त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे नीघउन जाईल व तयार चक्का याप्रमाणे दिसेल –

चक्का

२)तसेच १ टे .स्पून दुधात केशराच्या काड्या  भिजत घालाव्या

कृती-

१)एका बाउलमध्ये तयार चक्का घ्यावा व त्यात पिठीसाखर मिसळून घ्यावी व चांगले एकजीव करून घ्यावे आता हे मिश्रण एका मैदा किंवा पीठ गाळणीने गाळून घ्यावे म्हणजे त्यातील रवाळपणा निघून जाईल .

२)आता या मिश्रणात केशर मिश्रीत दूध घालावे  तसेच इलायची पूड घालून चांगले एकजीव करून घ्यावे व गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करावे .

टीप-

१)चक्क घट्टच असावा कारण पीठीसाखारेचे पाणी सुटते

२)दही फ़ार आंबट असू नये असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे

३)श्रीखंडाला नैसर्गिक केशाराचाच रंग व स्वाद राहू द्यावा त्यात कृत्रिम केशरी रंग घालू नये .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: