आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

उपमा

                          

उपमा

साहित्य-  

१)रवा-१ छोटी वाटी (५ टे.स्पून)

२)१ कांदा -बारीक चिरलेला

३)१ छोटा टमाटा-बारीक चिरलेला

४)हिरव्या मिरच्या ३ ते ४ -बारीक चिरलेल्य५) भाजलेले तीळ-१/२ टे.स्पून

उपमा

 

६)चण्याची भाजलेली डाळ (दलिया)-१/२ टे.स्पून

७)जिरे-मोहोरी-१ टे.स्पून

८)कढीपत्ता-बारीक चिरून

९)मीठ-चवीनुसार

१०)तेल-गरजेनुसार

११)कोथींबीर

१२)हळद-१/४ टे.स्पून

कृती-

१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून तडतडू द्यावी आता यात दलिया ,बारीक चिरलेला कढीपत्ता घालावा व परतून घ्यावे

२)बारीक चिरलेला कांदा,हिरव्या मिरच्या ,टमाटा घालून चांगले परतून घ्यावे यातच भाजलेले तीळ घालावे व हळद घालून परतून घ्यावे

३)वरील मिश्रणात रवा घालून चांगले एकजीव करून घ्यावे ,रवा ५ ते ७ मिनिटं परतून घ्यावा व त्यात अंदाजे २ वाट्या गरम पाणी घालावे व चांगले ढवळून घ्यावे यातच चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे .

४)पाणी घातल्यानंतर सारखं ढवळत रहावे नाहीतर रव्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते ,पाणी पूर्ण आटल्यानंतर आच बंद करावी कोथींबीर टाकुन सजवावे व ओले खोबरे आणी लिंबाची फोड ठेवून सर्व्ह करावे. 

Advertisements

Comments on: "उपमा" (1)

  1. Upamyala upama nahi…
    Excellent URL

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: