आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

बटाटा वडा (आलू वडा)

साहित्य : १) मध्यम आकाराचे ५-६ बटाटे
२) मध्यम आकाराचे २ कांदे
३)मिरची ४-५
४) लसुण पाकळ्या  ३-४
५)कोथिंबीर गरजेनुसार
६) जिरे, मोहरी
७) बेसन पीठ १ वाटी
८) लाल मिरची पावडर १ टे. स्पू.
९) हळद,धणेपूड ,गोडा मसाला  चिमुटभर
१०)मीठ गरजेनुसार.
११)तेल (फोडणीसाठी व तळण्यासाठी)

कृती :
१) बटाटे कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावे.साल काढून masherane बारीक कुस्कुरून घ्यावे .  (बटाटे जितके छान कुस्काराल तितके बटाटे वडे छान होतील.)
२)मिरची, कांदा,लसुण बारीक चिरून घ्यावा.
३)कढईत तेल टाकून जिरे ,मोहरी , लसुणची फोडणी द्यावी . नंतर त्यात चिरलेली मिरची, कांदा टाकावा.
४)कांदा थोडा लालसर झाल्यावर हळद, धणेपूड व गोडा मसाला टाकावा.
५)नंतर कुस्करलेले बटाटे टाकावे. सर्व जिन्नस एकजीव करावे .२ minute शिजू द्यावे.नंतर कोथिंबीर टाकावी.
६)एका भांड्यात बेसन पीठ घ्यावे. त्यात लाल मिरची पावडर, हळद,मीठ टाकावे. पाणी घालून मिश्रण पातळ करून  घ्यावे.
७)कढईत तळण्यासाठी तेल घ्यावे.बटाटा भाजीचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून घ्यावे. ते बेसन पिठाच्या मिश्रणात बुडवून तेलात लालसर रंगात तळुन घ्यावे.


८) Tomato sauce बरोबर पावासोबत खावे.

टीप : पातळ बेसन असल्यामुळे बारीक तुकडे तेलात वेगळे होतात, त्या तळलेल्या तुकड्यात मिरची पावडर टाकून वड्याबरोबर सर्व्ह करावे.

Advertisements

Comments on: "बटाटा वडा (आलू वडा)" (3)

  1. recepie uttam presentation zale

  2. vada receipe chan chavisht baher paus padato aahe aasha velela vada khayachi maja kahi ourach

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: