आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

पापलेट फ्राय

 

पापलेट फ्राय

 

साहित्य- 

१)पापलेट-१ मध्यम आकाराचा

२)बेसन-२ टे.स्पून
३आलं-लसूण पेस्ट-१ टे स्पून

पापलेट फ्राय

४)लिंबू रस -१ टे.स्पून

५)हळद-१/२ टे.स्पून

६)फिश मसाला -१ टे.स्पून

७)लाल तिखट -१ टे.स्पून

८)रवा -गरजेनुसार

९)मीठ -चवीनुसार

१०)तेल -गरजेनुसार

 ११)धणेपूड-१ टे.स्पून

पूर्वतयारी-

१)मेरीनेशन –

सर्वात आधी पापलेट नीट धुवून घ्यावे व त्यांना आडवे काप द्यावेत .आता या पापलेटला लिंबू रस चोळून घ्यावा त्यानंतर हळद व आलं-लसून पेस्ट लावावी हे सर्व जिन्नस नीट कापांमध्ये नीट चोळावे व झाकून ठेवावे , साधारण १ टे दीड तास मेरीनेट होवू द्यावे  मेरीनेटेड पापलेट खालीलप्रमाणे दिसतील-

मेरेनेटेड पापलेट

२)मसाला –

आता एकां प्लेटमध्ये बेसन,लाल तिखट ,फिश मसाला,धनेपूडव मीठ एकत्र करावे ,मसाला तयार आहे.

कृती-

१)पापलेट १ ते दीड तास मेरीनेट झाल्यावर त्यांना एका प्लेटमध्ये घ्यावे व वरील तयार मसाला चांगला लावून घ्यावा ,मसाला लावलेले पापलेट खालीलप्रमाणे दिसतील-

मसाला लावलेले पापलेट

२)मसाला लावल्यानंतर पापलेट रव्यात घोळवून घ्यावे .एका नॉण-स्टिक प्यनामध्ये थोडे(११/२ ते.स्पून)  तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यावर मसाला लावलेला पापलेट अलगद ठेवावा व चांगले शेकून घ्यावे .शेकत असतांना मध्ये मध्ये पापालेटला चमचाने थोडे दाबत रहावे म्हणजे चांगले खरपूस व सर्व बाजुंनी शेकले जाते .साधारण ५ मिनिटाच एक बाजू शेकली जाते .

३)५ मिनीटानी दुसरी बाजूही तशीच खरपूस शेकून घ्यावी व गरमागरमं पापलेट सलाडसोबत सर्व्ह करावे .

टीप-

१)पापलेट मासेवाल्या लोकांकडूनाच साफ करून आणावेत

२)पापलेट फ्राय करत असतांना त्यावर झाकण ठेवू नये नाहीतर वाफेचे पाणी माश्यांवर पडून ते ओलसर होतात .

 

Advertisements

Comments on: "पापलेट फ्राय" (1)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: