आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

 
 

शेवगा-बटाटा खानदेशी झटका

साहित्य-

१)शेवगाच्या शेंगा-३ (जाड)

२)बटाटे-३ मध्यम आकाराचे

३)कांदा-१ मोठा

४)लसुण-६ ते ७ पाकळ्या

५)आलं-दीड इंच

६)कोथींबिरीच्या काड्या

७)हळद-१/४ टे.स्पून

८)धणेपूड-१ टे.स्पून

९)लाल तिखट-दीड टे.स्पून

१०)जीरे-१/२ टे.स्पून

११)तमालपत्र-१

१२)कढीपत्ता

१३)मीठ-चवीनुसार

१४)तेल-गरजेनुसार

१५)बाजरी/चणाडाळ पीठ-१ टे.स्पून

पूर्वतयारी-

१)प्रथम शेवगाच्या शेंगा सोलुन घ्याव्यात व गरम पाण्यात उकळायला ठेवावे,शेंगा चांगल्या मऊसर शिजल्या कि त्यांना एका चाळणीत निथळत ठेवावे.पाणी निथळल्यावर त्यापैकी एक एक शेंग घेऊन तिला उघडायचे व चॊपिंग बोर्ड्वर शेंग ठेवुन चमचाच्या सहय्याने त्यातील गर काढुन घ्यावा व त्याची मिक्सरमधुन बारिक पेस्ट बनवुन घ्यावी.

२)एक मोठ्या कांद्याचे पातळ उभे काप करुन घ्यावे व गरम तेलात ते काप चांगले खरपुस तळुन घ्यावेत,हे तळलेले काप एका मिक्सरच्या भांड्यात घालावेत आता यातच आलं,लसुण,कोथींबिरीच्या काड्या,हळद,लाल तिखट,धणेपूड व जीरे घालुन याची मिक्सरमधुन बारिक पेस्ट करुन घ्यावी.

कृती-

१)एका कढईत तेल गरम करायला ठेवावे त्यात  तमालपत्र व कढीपत्ता घालावा आता लगेच यात बाजरीचे पीठ किंवा बेसन घालुन थोडे लालसर होऊ द्यावे मग यात वर तयार केलेला मसाला (पूर्वतयारी २ ) घालावा व  चांगले  पर्तुन घ्यावे.

२)मसाल्यातुन तेल सुटायला लागले कि त्यात वरीलप्रमाणे तयार केलेली शेवग्याची प्युरी(पूर्वतयारी १ ) टाकावी व चांगले एकजीव करुन परतुन घ्यावे तितक्यात बटाटे सोलुन त्याच्या मोठ्या फ़ोडी कराव्यात व पाण्यात बुडवुन ठेवाव्यात .

३)मसाला व प्युरी चांगले परतुन झाले कि त्यात बटाटाच्या फ़ोडी घालाव्यात व चांगले परतुन घ्यावे आणी त्यात साधारण ३ ते ४ वाट्या पाणी घालावे,चवीनुसार मीठ घालुन ढवळुन घ्यावे व झाकण ठेवावे.

४)बटाटे शिजले कि गॆस बंद करावा व कोथींबिर घालुन सर्व्ह करावे .ही डिश भातासोबत खुप छान लागते.

Advertisements

Comments on: "शेवगा-बटाटा खानदेशी झटका" (4)

 1. khandeshi padarthchi mi fan ahe
  khup chaan ajun yevu de
  ek kalakalichi request ,
  kalanyachi bhakari chi recipi pan post kara lahanpani khaleli ajun athavate pan recipi nahi kuth milali.

  • आपली विनंती अगदी मान्य, लवकरच कळण्याची भाकरी बद्दल लिहू. आपला विरोपाचा पत्ता दिला तर आपल्याला कळवता येइल. किंवा आम्हाला या पत्त्यावर लिहा mejwanimails[at]gmail[dot]com

 2. Now this is it. We “Khandeshi’s” on web with our food.

  Best One,
  Like/Love it.
  Thanks

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: