आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

कुरडई फ़्राय

साहित्य-

१) गव्हाच्या कुरडया-३

२)कांदा-१ मोठा

३)आलं-लसुण पेस्ट-१ टी.स्पून

४)जीरे-मोहोरी

५)शेंगदाणे-१ टे.स्पून

६)कढीपत्ता-बारिक चिरुन

७)हळद-१/४ टे.स्पून

८)धणेपूड-१ टी.स्पून

९)लाल तिखट-२ टी.स्पून

१०)मीठ-चवीनुसार

११)तेल-गरजेनुसार

कृती

१)प्रथम कुरड्या एका भांड्यात घ्याव्यात व त्या बुडतील इतके पाणी ओतावे व साधारण १ ते दीड तास भिजु द्यावे/

२)१ ते दीड तासांनी कुरडयांमधील पाणी निथळुन घ्यावे व त्या चुरुन घ्याव्यात म्हणजे त्यांचे तार तार मोकळे होतील.

३)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीरे-मोहोरी घालुन ती चांगली तडतडु द्यावी लगेच त्यात कढीपत्ता, आलं-लसुण पेस्ट,उभा चिरलेला कांदा घालावा व कांदा सोनेरी रंगावर परतुन घ्यावा व त्यात हळद , धणेपूड,लाल तिखट घालुन परतुन घ्यावे.

४)आता यात कुरडयांचे तार घालुन परतुन घ्यावे चवीनुसार मीठ घालुन हलवुन घ्यावे व झाकण ठेवुन एक वाफ़ काढावी कारण कुरडया लवकर शिजतात म्हणुन लगेच गॆस बंद करावा.

५)कोथींबिर घालुन सजवावे ,ही डिश वरण-भातासोबत तोंड्लावणी म्हणुन पण खाउ शकतात.

टीप-

कुरडया आज काल बर्याचश्या सूपर मार्केटमध्ये पण उपलब्ध असतात.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: