आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

साबुदाणा खिचडी

साहित्य-

१)साबुदाणा-१ वाटी

२)शेंगदाण्याचा कूट-अर्धी वाटी

३)हिरव्या मिरच्या-४ ते ५ आड्व्या-उभ्या चिरुन

४)शेंगदाणे-१ टे.स्पून

५)जीरे-१/२ टे.स्पून

६)चवीनुसार मीठ

७)गरजेनुसार तेल

८)लिंबाचा रस-१/२टे.स्पून

९)कोथींबिर

कृती-

१)प्रथम साबुदाणा भिजत घालावा.साबुदाणा भिजविण्यासाठी-एका भांड्य़ात साबुदाणे घ्यावेत साबुदाणे पूर्णपणे बुडतील इतके पाणी घालावे व लगेच पाणी निथळुन घ्यावे अगदी थोडेसे पाणी शिल्लक ठेवावे व झाकण  ठेवावे .साधारण २ तासांनी त्यात लिंबाचा रस घालावा व पुन्हा झाकुन ठेवावे व साधारण १ ते दीड तासांनी साबुदाणे करायला घ्यावेत.

२)एका कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरे घालावे ,जीरे तड्तड्ले कि त्यात हिरव्या मिरच्या घालाव्यात तसेच शेंगदाणे घालावे व हलवुन घ्यावे  

३)शेंगदाण्याचा कूट भिजवलेल्या साबुदाण्यात टाकुन चांगले मिक्स करुन घ्यावे व हे साबुदाणे वरील मिश्रणात घालावे .चवीनुसार मीठ घालावे व चांगले एकजीव करुन घ्यावे व झाकण ठेवावे

४)साधारण १ ते २ वाफ़ा काढुन घ्याव्यात व कोथींबिरीने सजावट करुन लिंबाच्या फ़ोडीसोबत सर्व्ह करावे.

टीप-

आवडत असल्यास बटाटाचा किसही घालु शकतात.

साबुदाणा भिजत घातलेला असतांना मध्यच तो कोरडा झाल्याचे वाटल्यास थोडे पाणी शिंपडावे व पुन्हा झाकुन ठेवावे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: