आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

साहित्य-

१)१मध्यम  आकाराचा दूधी(साधारण  ४०० ते ५०० ग्राम)

२)३ ते ४ वाटी थालीपीठाची भाजणी

३)आलं-.लसुण पेस्ट-१ टे.स्पून

४)भाजलेली तीळ-१/२ टे.स्पून

५)ओवा-१/२टे.स्पून

६)मीठ-चवीनुसार

७)कोथींबिर-१/२ वाटी

८)तेल-गरजेनुसार

थालीपीठाची भाजणी नसल्यास आपल्याकडे उपलब्ध धान्यांचे पीठ वापरावे.मी खालीलप्रमाणे पीठं  वापरली होती-

गव्हाची कणिक-सव्वा वाटी

बेसन-१/२ वाटी

बाजरीचे पीठ-१/४ वाटी

कळण्याचे पीठ-१/२ वाटी

कृती-

१)थालीपीठाची भाजणी नसल्यास वरील सर्व पीठं एकानंतर एक नीट खरपूस भाजुन घ्यावी .

२)आता यात हळद,चटणी,आलं-लसुण पेस्ट,तीळं,जीरे,ओवा ,कोथींबिर,चवीनुसार मीठ घालुन चांगले एकजीव करुन घ्यावे.

थालीपीठ

३)याच पीठात दूधी किसुन घ्यावा व पीठ मळुन घ्यावे .पीठ मळतांना पाणी घालु नये कारण दूधीला पाणी सुटते त्यातच पीठ मळले जाते.हे पीठ थोडे सैलसरच असते .

४)आता तवा गरम करत ठेवावा ,एका पोळपाटावर एक छोटा सुती रुमाल टाकावा व त्यावर पाणी शिंपडुन घ्यावे आता तयार पीठाचा एक गोळा घेउन तो या रुमालावर पाण्याचा हात लावुन थापावा,थापलेले थालीपीठ याप्रमाणे दिसेल-

५)तव्यावर अर्धी पळी तेल टाकावे व थापलेले थालीपीठ रुमालासहित तव्यावर टाकावे एक बोट थालीपीठाला लावावा तर दुसर्या हाताने रुमाल अलगद उचलुन घ्यावा

६)थालीपीठाला मध्यभागी एक छोटे भोक पाडावे व झाकण ठेवुन वाफ़ु द्यावे दुसर्या बाजुनेही तसेच नीट शेकुन घ्यावे.

७)गरमागरम थालीपीठ टोमॆटो सॊसबरोबर किंवा लसुण-शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

Advertisements

Comments on: "दूधी भोपळ्याचे थालीपीठ" (3)

 1. Thanks “Team Mejwani”…..
  .
  .
  मला खुप टेंशन होत माझ्या भविष्याबद्दल कारण आताच्या मुलींचा & स्वयंपाकाचा ३६ चा आकडा आहे तर कस होइल…

  पण तुमचे उत्कृष्ठ मेनू बघून दिलासा मिळाला…
  ईतकी विस्तारित & व्यवस्थित माहिती बघून तर कुणीही झक्कास स्वयंपाक बनवेल…

 2. Dear Mejwani,

  Tumchya receipes khupach chan aahet aani tya marathit aslyamule aankhin chan vatat..
  I just want to say ..thanku very much !!
  Keep up the good work …& keep sharing such yummy receipes…Thanx !

  Best Regards,
  Kavita Kale

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: