आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

मटर पनीर

साहित्य-

१)मटारचे दाणे-१ वाटी

२)पनीर -१५० ते २०० ग्राम

३)१ मध्यम कांदा -बारिक चिरुन

४)१ छोटा टमाटा-बारिक चिरुन

५)कांदा-टोमॆटो प्युरी

६)लाल तिखट-२ टे.स्पून

७)धणेपूड-१ टे.स्पून

८)काजु पेस्ट-१ टे.स्पून (ऎच्छिक)

९)हळद-१/२ टे.स्पून

१०)दही-२ टे.स्पून

११)कसूरी मेथी-१ टे.स्पून

१२)मीठ-चवीनुसार

१३)तेल-गरजेनुसार

१४)आलं-लसुण पेस्ट

 

पूर्वतयारी-

१)कांदा-टोमॆटोची प्युरी बनविन्यासाठी –पालक पनीरची रेसेपी पहा त्यात हि कृती दिलेली आहे.

२)पनीर मॆरिनेट करण्यासाठी-एका बाउलमध्ये दही ,चिमुट्भर हळद,१/२ टे.स्पून लाल तिखट,१/४ टे.स्पून कसूरी मेथी एकत्र करुन नीट फ़ेटुन घ्यावे व ह्यात पनीरचे तुकडे घालावेत व हलवुन घ्यावे हे मिश्रण झाकुन ठेवावे.

कृती-

१)एका कढईत तेल गरम करयला ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जीर-मोहोरी घालावी,जीरे-मोहोरी तड्तड्ली कि त्यात बारिक चिरलेला कांदा व टोमॆटो घालुन परतुन घ्यावे.

२)५ मिनीटांनी त्यात कांदा-टोमॆटो प्युरी घालावी व चांगले परतुन घ्यावे.

३)आता यात काजुची पेस्ट,आलं-लसुण पेस्ट घालावी तसेच हळद,धणेपूड,लाल तिखट घालुन ५ ते १० मिनीट परतु द्यावे व त्यानंतर त्यात मटारचे दाणे घालुन थोडे शिजु द्यावे व साधारण २ वाट्या गरम पाणी घालावे.

४)चवीनुसार मीठ घालावे व मटारचे दाणे शिजण्यात आल्यावर मॆरिनेटेड पनीर घालुन चांगले एकजीव करुन घ्यावे,सर्वात शेवटी भाजलेली कसूरी मे्थी  घालुन गेस बंद करावा व कोथींबीर घालुन सर्व्ह करावे.

Advertisements

Comments on: "मटर पनीर" (2)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: