आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

चिकन हंडी

प्रमाण-साधारण २ जणांसाठी

chicken handi

साहित्य-

१)चिकन-४००ग्राम

२)२ मोठे कांदे

३)१ वाटी सुके खोबरे(छोटी)

४)लसुण-८-१० पाकळ्या

५)आलं-२ इंच

६)जीरे-१ टे.स्पून

७)हळद-१/२ टे.स्पून

८)धणेपूड-१ टे.स्पून

९)लाल तिखट-२ टे.स्पून

१०)गरम मसाला-१/२टे.स्पून

११)कोथींबिरीच्या काडया

१२)तमालपत्र-१

१३)कढीपत्ता

१४)बाजरी/चणाडाळीचे पीठ-१ टे.स्पून

१५)चवीनुसार मीठ

१६)गरजेनुसार तेल

पूर्वतयारी-

१)चिकन स्टॊक बनवुन घेणे-

चिकन नीट धुवुन घ्यावे .एका प्रेशर कूकरमर्ध्ये तेल गरम करत ठेवावे व त्यात जीरे व बारिक चिरलेला कांदा घालावा,चिमुटभर हळद लावी कांदा गुलाबीसर झाल्यावर त्यात धुतलेले चिकन घालावे व तेलात चांगले १० मिनीट परतावे व त्यात चिकन पूर्णपणे बुडेल एवढे गरम पाणी घालावे व कूकरचे झाकण लावुन घ्यावे .साधारण २ ते ३ शिट्ट्या झाल्यावर गॆस बंद करावा,आपला चिकन स्टॊक तयार असेल.तयार झालेला चिकन स्टॊक प्रमाणे दिसेल .हे उकडलेले चिकन चिकन फ्रायच्या रेसेपीसाठी वापरता येईल

२)चिकनसाठी मसाला बनवुन घेणे-

अ)१ मोठा कांदा उभा चिरुन घ्यावा ,तवा गरम करत ठेवावा गरम तव्यात चिरलेला कांदा व १/२ टे.स्पून तेल घालावे व कांदा तपकिरी

मसाला

रंगावर भाजुन घ्यावा ,भाजलेला कांदा मिक्सरच्या भांड्यात काढुन घ्यावा व त्याच तव्यात किसलेले सुके खोबरे(१छोटी वाटी)घालावे व खरपुस भाजुन घ्यावे पण जळु देऊ नये,हे भाजलेले खोबारेही कांदा घातलेल्या मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यातच आलं,लसुण,जीरे,कोथींबिरीच्या काड्या,हळद, धणेपूड,लाल तिखट,गरम मसाला घालावा व थोडे पाणी घालुन बारिक पेस्ट बनवुन घ्यावी,आपला मसाला तयार असेल.तयार मसाला ह्याप्रमाणे दिसेल.

कृती-

१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे,तेल गरम झाले कि त्यात तमालपत्र व कढीपत्त घालावा ,त्यानंतर बाजरी/चणाडाळीचे पीठ घालावे व चांगले गुलाबी होईपर्य़त परतावे ,आता यात चिकनसाठी  तयार केलेला मसाला घालावा.

२)तेलात मसाला परतुन घेत असतांना पुन्हा पुन्हा नीट हलवुन घ्यावे म्हणजे मसाला खाली चिकटनार नाही,मसाल्यातुन तेल सुटायला लागल्यावर ह्यात चिकनचे तुकडे घालावेत व चांगले परतुन घ्यावे .

३)चिकनचे तुकडे मसाल्यात नीट परतल्यावर यात चिकन स्टॊक (पूर्वतयारी (१)) घालावा व एकजीव करुन घ्यावे,चांगल्या ३ ते ४ उकळ्या येऊ द्याव्यात ,चवीनुसार मीठ घालुन ढवळुन घ्यावे

४)३ ते ४ उकळ्यांनंतर गॆस बंद करावा व कोथींबीर घालुन गरमागरम सर्व्ह करावे पोळी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत आणि सोबत थोडा भात व सोलकढी असेल तर मस्तच बेत होईल

टीप-

१)चिकन स्टॊकचा उपयोग चिकन सूप म्हणुनही करु शकतात.

२)चणाडाळीच्या पीठाऎवजी भाजलेल्या चणाडाळीचं(दलिया) पीठही वापरु शकतात तसेच कांदा तव्यावर भाजुन न घेता तळुनही मसाल्याकरिता वापरु शकतात.

३)आवडत असल्यास सर्वात शेवटी थोडी भाजलेली कसूरी मेथीही घालु शकतात.

Advertisements

Comments on: "चिकन हंडी" (6)

 1. Mast recipe aahe aani blog pan ekdum inspiring!

 2. hello mejwani,

  chicken reciepe pahun..my mouth has started watering …….apratim aahe ….keep up the good work..and try uploading new receipes 🙂

  Thanku

  kavita 🙂

 3. aho pan evadhya shitya kelya var chicken cha gal hoil
  adhich 10 min paratale ahe na tya peksha as liha ki 10 12 min madhyam ache var thevaun shijvun ghya.

  mala asha padhtine chicken shijavayala 18 20 min lagatat jast telat n paratataa.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: