आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

गाजरचा हलवा

साहित्य-

१)गाजर-१/२ किलो

२)साजुक तूप-१/२वाटी

३)साखर-१ वाटी(साधारण १० टे.स्पून)

४)काजु-बदाम आवडीनुसार

५)मावा-

कृती-

१)गाजर किसुन घ्यावे व तो किस दोन्ही हातात दाबुन त्यातील जास्तीचा रस काढुन टाकावा.

२)एका कढईत तूप गरम करावे त्यात किसलेले गाजर घालुन चांगले परतुन घ्यावे ,मिश्रण थोडे  कोरडे झाले कि त्यात साखर घालावी व चांगले परतुन घ्यावे.

३)साखर टाकल्यानंतर हलव्याला पाणी सुटायला लागते ,पाणी थोडे आटल्यानंतर त्यात मावा टाकावा व हलवुन घ्यावे व हलवा पूर्ण आटल्यानंतर त्यात काजु-बदामाचे काप घालावे व आच बंद करावी.

४)गरमागरम हलवा सर्व्ह करावा.

टीप-

कंडेन्स्ड मिल्क वापरूनही हलवा बनवता येऊ शकतो त्यासाठी गाजराचा किस थोडा कोरडा होईपर्यंत तुपात परतून घ्यावा त्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क (मिल्क मेड )घालावे व परतून घ्यावे .यांत साखर जरा बेतानेच घालावी कारण कंडेन्स्ड मिल्क्मध्ये साखर असतेच ,साखर घालून परतून घ्यावे त्याला सुटलेले पाणी आतले कि त्यात आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट घालून सर्व्ह करावे .

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: