आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

बैदा करी

साहित्य-

१)उकडलेले अंडी-४

२)१ मोठा कांदा-पातळ उभे काप करुन

३)१ मध्यम आकराचा टोमॆटो-बारिक उभा चिरुन

४)आलं-लसुण पेस्ट-१ टे.स्पून

५)हळद-१/२ टे.स्पून

६)धणेपूड-१/२ टे.स्पून

७)लाल तिखट-२ टे.स्पून

८)कढीपत्ता

९)मीठ-चवीनुसार

१०)तेल-गरजेनुसार

११)जीरे-मोहोरी

कृती-

१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात कढीपत्ता व जीरे-मोहोरी घालावी ,जीरे-मोहोरी तड्तड्ली कि त्यात उभा चिरलेला कांदा घालावा व परतुन घ्यावे.

२)कांदा गुलाबीसर झाल्यावर तयात टोमॆटो घालावा व एक मिनीट परतुन घ्यावे ,आता यात,हळद ,धणेपूड,लाल तिखट घालुन चांगले परतुन घ्यावे

३)यात १ते दीड वाटी गरम पाणी घालावे पाण्याला उकळी येईपर्यंत उकडलेल्या अंड्याचे गोल काप करुन घ्यावेत त्या कापांमधुन पिवळा बलक वेगळा करुन घ्यावा

४)वरील सार उकळला कि त्यात अंड्याचा पिवळा बलक कुस्करुन टाकावा व एकजीव करुन घ्यावे पिवळा बलक घातल्यानंतर साराला घट्ट्पणा येईल  त्यात अंड्याच्या पांढर्या बलकाचे काप घालुन १ ते २ उकळ्या येऊ द्याव्यात चवीनुसार मीठ घालावे व ढवळुन घ्यावे

५)गॆस बंद करुन कोथींबिर घालुन गरमागरम सर्व्ह करावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: