आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

वांग्याचे भरीत

साहित्य-

१)भरताचे वांगे-२ मध्यम आकाराचे

२)१ मोठा कांदा-बारिक चिरुन

३)१ टमाटा-बारिक चिरुन

४)शेंगदाणे-२ टे.स्पून

५)खोबर्याचे काप-८-१०

६)मिरचीचा ठेचा-२ टे.स्पून

७)हळद-१/२ टे.स्पून

८)जीरे-मोहोरी-१ टे.स्पून

९)कांद्याची पात-१ वाटी

१०)कोथींबिर

११)मीठ-चवीनुसार

१२)तेल-गरजेनुसार

१३)आल-लसुण पेस्ट-२ टे.स्पून

१४)धणेपूड-१/२ टे.स्पून

कृती-

१)वांग्यांना तेल लावुन गॆसवर सर्व बाजुंनी भाजुन घ्यावे ,वांगे कच्चे राहणार नाहि याची काळजी घ्यावी

२)वांग्यांच्या काळ्या साली व देठ काढुन टाकावे व वांगे मॆश करुन घ्यावे.(वांग्यात अळ्या तर नाहित ना? याची खात्री करुन घ्यावी.)

३)एक कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात कढीपत्ता,जीरे,मोहोरी घालावी.जीरे-मोहोरी तड्तड्ली कि त्यात कांदा,आलं-लसुण पेस्ट व मिरचीचा ठेचा घालुन परतुन घ्यावे.

४)आता यातच शेंगदाणे,खोबर्याचे काप घालुन परतावे यानंतर टमाटा घालुन परतुन घ्यावे.हळद व धणेपूड घालुन चांगले एकजीव करावे.

५)या मिश्रणात मॆश केलेले वांगे घालावे व हलवुन घ्यावे तसेच चवीनुसार मीठ घालुन परतुन घ्यावे.

६)१० ते १५ मिनीट झाल्यानंतर गॆस बंद करावा व भरपूर कोथींबिर घालावी तसेच बारिक चिरलेला पाती कांदा घालुन पुरी किंवा कळण्याच्या भाकरीसोबत
सर्व्ह करावे.

Comments on: "वांग्याचे भरीत" (1)

  1. amhi halad tikhat tamata dhanepud khobar ghalat nahi
    kapaleli mirachi,lasun,kande pat ,kothibir kanda shengdane tevad ghalato phodanit.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

Tag Cloud

%d bloggers like this: