आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

खिचडी

साहित्य-
१)तांदुळ-१००ग्राम
२)तूर डाळ-५०ग्राम
३)१मोठा कांदा बारिक चिरुन
४)१ टोमॆटो
५)१ छोटा बटाटा
६)शेंगदाणे-२ ट.स्पून
७)आलं-लसुण पेस्ट-१ टे.स्पून
८)लाल तिखट-२टे.स्पून
९)धणेपूड-१ टे.स्पून
१०)गरम मसाला-१/२ टे.स्पून
११)हळद-चिमुट्भर
१२)तमालपत्र-१
१३)कढीपत्ता -५-६
१४)मीठ-चवीनुसार
१५)तेल-गरजेनुसार
१६)जीरे-मोहोरी
क्रुती-
१)एका प्रेशर कूकरमध्ये तेल गरम करत ठेवावे त्यात जीरं,मोहोरी टाकावी,जीरे-मोहोरी तड्तडली की त्यात तमालपत्र व कढीपत्ता घालावा.
२) बारिक चिरलेला कांदा घालावा तसेच आलं-लसुण पेस्ट घालुन परतुन घ्यावे.
3)शेंगदाणे,बारिक चिरलेला टमाटा,बटाटा घालुन परतुन घ्यावे.
४)हळद,धणेपूड,लाल् तिखट,गरम मसाला घालुन परतुन घ्यावे आता यातच धुतलेले डाळ व तांदूळ घालुन ५ ते १० ममिनीट परतुन घ्यावे
५)डाळ-तांदूळ व मसाला नीट एकजीव झाल्यावर त्यात गरम पाणी घालावे व मीठ घालुन मिश्रण ढवळुन घ्यावे व झाकण लावावे.
६)२ ते ३ शिट्ट्या झाल्यावर आच बंद करावी व झाकण उघडल्यावर कोथींबीर घालुन गरमागरम खिचडी कढीसोबत सर्व्ह करावी.
टीप-
प्रत्येक तांदळासाठी पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते तेव्हा आपल्या तांदळाला लागणारे पाण्याचे प्रमाण ओळखुन पाणी घालावे.
Advertisements

Comments on: "खिचडी" (2)

  1. wah………!
    mast….khup bhuk lagli plate baghun.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

टॅगचे ढग

%d bloggers like this: