साहित्य-
१)साबुदाणा खिचडी -१ मोठी वाटी
बटाट्याची भाजीसाठी -
१)उकडलेले बटाटे -२ ते ३
२)हिरव्या मिरच्या -२ ते ३ बारीक चिरून
४)चवीनुसार मीठ
५)गरजेनुसार तेल
आमटीसाठी -
१)जिरे-१/२ टी स्पून
२)लाल तिखट-१ टी स्पून
३)शेंगदाणा कूट-३ ते ४ टी स्पून
४)चवीनुसार मीठ
५)गरजेनुसार तेल
६)कोथींबीर
२)बटाट्याचा चिवडा
३)बटाटा किंवा केळीचे चिप्स
४)लिंबू
कृती-
१)सर्वात प्रथम साबुदाणा खिचडी बनवून घ्यावी .
२)आता बटाटयाची भाजी बनविण्यासाठी सर्वात रथं एका कढईत तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात जिरे घालून ते तडतडू द्यावे त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे व त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात व परतून घ्यावे चवीनुसार मीठ घालावे व भाजी पुढील ५ ते ७ मिनिटं परतू द्यावी .त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथींबीर घालावी ,बटाटा भाजी तयार झाली .
३)आता आपण आमटी बनवून घेउया त्यासाठी एका भांड्यात तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे घालून तडतडू द्यावे आता यांत लाल तिखट व शेंगदाणा कूट घालून परतून घ्यावे व लगेचच पाणी घालावे तसेच चवीनुसार मीठ घालून आमटीला १ ते २ उकळू येऊ द्यावी त्यानंतर आच बंद करावी व बारीक चिरलेली कोथींबीर घालावी ,आमटीही आता तयार आहे .
४)आता एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्वात आधी साबुदाणा खिचडी घालावी त्यानंतर त्यावर बटाटा भाजी घालावी व यानंतर आमटी टाकावी व सर्वात शेवटी बटाट्याचा चिवडा व चिप्स चुरून घालावे वर लिंबाची फोड ठेवून मिसळ सर्व्ह करावी .





